You are currently viewing प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच,गझल मंथन, गझल प्राविण्य, ग्रुप सदस्या लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांची काव्यरचना*

*प्रजासत्ताक दिन*

दिन आज आनंदाचा सर्व भारतीयांचा
प्रजासत्ताक या गणतंत्र दिन भारताचा
राज्य घटनेची सुरुवात २६ जा.१९५० ला
७३ वा दिन आज करतो आपण संविधानाचा.

१४ ऑगस्ट १९४७ ला मध्यरात्री भारत देश
झाला स्वतंत्र ब्रिटिश राज्याच्या पारतंत्र्यातून
स्वातंत्र्याचा पंच्चात्तर वर्षाचा झाला कालावधी
१९५० पासून लोकशाही झाली संविधानातून.

स्वतंत्र भारताचे संविधान केले आंबेडकरांनी
२६ जा.१९३० पूर्णस्वराज शपथ दिन निवडला
प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेले राष्ट्र
संविधानाने भारताला लोकशाही देश बनवला.

रंगबेरंगी पताका व फुलांनी भारत देश सजला
लाल किल्यावर तिरंगी झेंडा डौलात फडकला
देशासाठी बलिदान दिले त्या सर्व हुतात्म्यांना
आदरांजली देण्यास भारतीयाने माथा झुकवला.

विश्वरत्न डाँक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे
राज्य घटना संविधान साकारले शिल्पकाराने
लोकशाही आली अन् नष्ट झाली अस्पृश्यता
सर्वांना आनंदी आनंद दिला दिन प्रजासत्तकाने.

समानता, बंधुभाव,न्याय देवता , मत अधिकार
राज्य घटनेनुसार प्राप्त झाले सकल भारतीयांना
लोकांचे, लोकांसाठी, लोकांच्या निर्णयाप्रमाणेच
लोकशाहीची सुरुवात केले संविधान प्रस्थापितांना.

शोभा वागळे
मुंबई.
8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा