You are currently viewing हीच देवाची हो लीला

हीच देवाची हो लीला

जागतिक “साकव्य” विकास मंचच्या सदस्या कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची काव्यरचना

रागावता हो आपण राग पोखरतो आम्हा
स्वास्थ्य घालवितो राग आणि पेटवितो तुम्हा
बोलणारा बोलून तो पहा निघूनच जातो
रागाच्या त्या आगीमध्ये आम्हाला तो तापवितो ….

बोलला हो जरी कुणी ध्यानी घेऊच नका ना
दुर्लक्षून त्याच्याकडे मनी धरूच नका ना
त्याच्या पायी स्वास्थ्य कशाला हो घालवावे
रागावणे त्याचा धर्म ते त्याला करू द्यावे…

मस्त हसावे लगेच उडवूनच लावावे
अंतरात डोकावून मनाला समजवावे
कोणापायी कशाला हो क्लेश मनाला ते द्यावे
मना आजारी पाडून रोगाला का बोलवावे …?

होतो रोग पहा सुरू मनापासूनच आधी
सर्वाआधी जडते हो पहा मनालाच व्याधी
मनातून शरीरात हळूहळू पसरतो
जडतात दुखणी नी शरीराचा ताबा घेतो…

वैद्य सांगतात हेच, लागे मनाला जेव्हा ठेच
आतड्यात येई पेच अन् मनाला हो कांच
राग फेका झटक्यात मन आवरा आवरा
रोग लागता पाठीशी जीव कावरा बावरा …

दुज्यासाठी नका लावू जीव पहा टांगणीला
नररत्ने ही अनेक हीच देवाची हो लीला …

प्रा.सौ.सुमती पवार, नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =