ठाण्यातील लोकप्रिय साहित्यिक रुपेश पवार आणि राजेंद्र सावंत या दोघांच्या सहकार्यातून
मुंबई :
टिटवाळा (पूर्व), हरी ओम व्याली कॉ. हौ. सोसायटीत प्रथमच एक अलौकिक काव्य संमेलनाचे आयोजन समाजसेवक, साहित्यिक, पत्रकार आणि कलाकार अशी ओळख असलेली अष्टपैलू व्यक्ती श्री राजेंद्र मधुकर सावंत यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून भव्य राज्यस्तरीय काव्यसंमेलन दि. १९ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे. महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सदर हा काव्यसोहळा आयोजित होत आहे. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शहरातून टूरवरच्या काव्य प्रेमींनी आपला सहभाग नोंदविला आहे. तरुण वर्गाला यातून प्रेरणा मिळावी आणि असे उपक्रम त्यांनीही राबवावे आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी हे उदिष्ट नजरेसमोर ठेवून श्री राजेंद्र सावंत ह्यांनी हा काव्यात्मक उपक्रम राबविला आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री विलास देवळेकर (समाजभूषण, साहित्यिक, कवी व गीतकार), मा. श्री शशिकांत सावंत. (जेष्ठ पत्रकार व थोर समाजसेवक, श्रेष्ठ कवी), मा. श्री दत्ताराम म्हात्रे. (प्रसिद्ध जेष्ठ शाहीर महाराष्ट्र राज्य) उपस्थित आहेत. मदर सोसायटीचे अध्यक्ष:,श्री भरतजी खरे (यांनी कार्यक्रमाकरिता सभागृह व्यवस्था केली आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवतील मा. श्री डॉ ख. र. माळवे. (राष्ट्रीय कवी, श्रामणेर बौद्धाचार्य, मराठी- हिंदी साहित्यिक, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कार्ते) या कार्यक्रमाचे आयोजक व संकल्पक राजेंद्र मधुकर सावंत आहेत, ते टिटवाळातील समाजसेवक, साहित्यिक, कलाकार, शॉर्ट फिल्म दिग्दर्शक ऑलराऊंडर कलाकार आहेत तसेच संयोजक आहेत. ऍडव्होकेट मा. श्री रुपेश पवार ते ठाण्यातील प्रसिद्ध साहित्यिक, गीतकार, कथाकार, व्याख्याते आणि ठाणे वैभवचे पत्रकार, कॉलम रायटर आहेत.
रुपेश पवार हे ठाण्यात २६ वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यव्रत आहेत. आयोजक, संयोजक म्हणून त्यांनी अनेक कार्यक्रमांचे ठाण्यात व मुंबईत संचालन केले आहे. त्यांची ई-बुक व प्रिंट बुक अशी एकंदर अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. २०१६ पासून त्यांनी नाट्य, चित्रपट लिखाणाला सुरुवात केली आहे परंतु ते जास्त करून गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. तीन ते चार यूट्यूब चैनल वर त्यांची गाणी प्रसिद्ध होत आहेत. वलयांकित हा चरित्र ग्रंथ रुपेश पवारांचा लोकप्रिय आहे. म्हणून रुपेश पवार यांनी चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून राजेंद्र सावंत यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अवचित्य साधून हा काव्य संमेलन समारंभ केलेला आहे. राजेंद्र सावंत व रुपेश पवार हे दोघेही साहित्यकलेचे उपासक असल्याने त्यांनी हा अभूतपूर्व कार्यक्रम टिटवाळ्यात घडवून आणला आहे. या कार्यक्रमाचे सर्व श्रेय रुपेश पवार राजेंद्र सावंत यांना देतात. राजेंद्र सावंत यांनी हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम करून टिटवाळा शहरात नवचैतन्य निर्माण केले आहे. रुपेश पवार, राजेंद्र सावंत हे सामाजिक उपक्रमातून कार्यक्रम करत असतात. समाजाला प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावे. याकरता हे दोघेही धडपडत असतात. त्यातून हे काव्य संमेलन उदयाला आले आहे.
चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट
रुपेश भै. पवार
चंद्रदर्शन हौसिंग सोसायटी, किसन नगर -३, रोड -१६
वागळे इस्टेट, ठाणे ४००६०४.
फोन ०२२-२५८१०७९ मो. ९९३०८५२१६५
