शस्त्रक्रियेसाठी 9 वर्षाच्या तन्मयला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून 20 हजार रुपयाची मदत.
सावंतवाडी
एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेला कु.तन्मय दळवी वय वर्ष 9 मुंबई वाडिया हॉस्पिटल परेल येथे 27 तारखेला त्याच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून 20 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
तसेच गांधी चौक येथील श्री गणेश स्टोअर्स किराणा मालाचे व्यापारी श्री जयप्रकाश बांदेकर यांच्याकडूनही मदतीचा हात मिळाला तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी सुद्धा मदत केली होती.
समाजामध्ये वावरत असताना सामाजिक भान राखून व सामाजिक बांधिलकी जपून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्मिळ आजार असलेल्या अशा अनेक मुलांना मदतीचा हात देवून त्या मुलांवर यशस्वी रित्या शस्त्रक्रिया झाल्याचे समाधान मिळाले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री सतीश बागवे म्हणाले तर आजतगायत अनेक रुग्णांचे प्राण वाचण्याची हि भाग्य सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्याला लाभले आहेत असे हि ते पुढे म्हणाले.
या मदत कार्यासाठी पुढाकार घेणारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची ऍक्टिव्ह मेंबर रूपा मुद्राळे यांचे वैयक्तिकरित्या फार मोठे योगदान असते त्याचीही कौतुक प्राध्यापक सतीश बागवे यांनी केले.
दळवी कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी छोटा तन्मय त्याचे आई-वडील तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे, भास्कर साधले,शरदिनी बागवे रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.
