मालवण :
शिवसेना पक्षाच्या युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कुडाळ मालवण पदी युवा नेतृत्व संग्राम सुधीर साळसकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. पक्ष नेतृत्व आणि त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.
नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साळी यांच्या स्वाक्षरी पत्राने संग्राम सुधीर साळसकर यांची शिवसेना पक्षाच्या युवा सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष (कुडाळ मालवण) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस शुभेच्छा ! असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
नियुक्तीनंतर संग्राम साळसकर यांनी शिवसेना युवासेना सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त करताना आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना अधिक बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. आमदार निलेश राणे यांनी मालवण कुडाळ मतदार संघात विकास कामाचा धडाका लावला आहे दहा वर्षे विकासाच्या प्रतिष्ठित असणाऱ्या या मतदारसंघांला व संजीवनी दिली त्यांचे नेतृत्वात आणि मार्गदर्शनात काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे अपेक्षित असे काम करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे संग्राम साळसकर यांनी सांगितले.