साळगाव महाविद्यालयात १३५ व्या जयंती निमित्त महामानवाला विनम्र अभिवादन..!
कुडाळ
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी भूगोल विभाग प्रमुख प्रा. रामदास पास्ते, आजीवन अध्ययन व विस्तार विभागप्रमुख प्रा. समीक्षा परब, राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक विभाग प्रमुख प्रा. अंकिता नवार उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी सिद्धेश म्हापनकर, आजीवन अध्ययन विद्यार्थी प्रतिनिधी मृणाली नारिंग्रेकर, सांस्कृतिक प्रतिनिधी गौरी दळवी, युनिव्हर्सिटी प्रतिनिधी रोहित चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
