You are currently viewing सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्तीपर्यंत चा रस्ता खुला करून द्या!

सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्तीपर्यंत चा रस्ता खुला करून द्या!

सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्तीपर्यंत चा रस्ता खुला करून द्या!

आमदार नितेश राणे यांच्या प्रांताधिकारी – गटविकास अधिकाऱ्यांना सूचना

अन्यथा “त्या” ग्रामसेवकावर एसीबी कारवाई करावी लागेल

सांगवे कनेडी बाजार ते तांडा वस्ती पर्यत जाणारा रस्ता गेली १०० वर्षे चालु होता. सदरच्या रस्त्यावर गुरुनाथ कारेकर यांनी ११ जानेवारी २०२४ रोजी रोजी पहाटे ५ वाजता जेसीबी च्या सहाय्याने खणून त्यावर सकाळी बांधकाम सुरु केलेले होते. सदरची जमीन ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्यामुळे आम्ही संरपंच व इतर ग्रामस्थाना या बाबतची माहिती दिली. सरपंच उपसरपच व आम्ही सर्व मिळुन या रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम चालु आहे ते थांबण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतु गुरुनाथ कारेकर यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देऊन मी बांधकाम थाबवणार नाही माझे काही ते करुन घ्या असे सांगुन सरपंच व उपसरपंच यांचा अपमान केला. तरी आम्हाला येण्या जाण्यासाठी अन्य कोणताही रस्ता नसल्यामुळे सदरचा रस्त्यावरील अतिक्रमण थांबऊन रस्ता त्वरीत चालु करुन दयावा किंवा सदर रस्त्यावर जेसीबी लावुन अतिक्रमण केल्याबात श्री. गुरुनाथ कारेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी करत येथील ग्रामस्थानी कणकवली प्रांताधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण छेडले. आमदार नितेश राणेंनी या उपोषणकर्त्यांची भेट घेत प्रांत अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली. तसेच संबंधिताने केलेले अनधिकृत बांधकाम वाचवत असाल तर तुमची एसीबी चौकशी करावी लागेल असा इशारा देखील ग्रामसेवकांना दिला. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत पाहणी करून घेतो असे सांगितले. पूर्वपार सुरू असलेला रस्ता बंद करता येतो का? असा सवाल यावेळी गोट्या सावंत यांनी उपस्थित केला. त्यावर प्रांताधिकारी श्री. कातकर यांनी शेतीकडे जाणारा रस्ता खुला करता येतो. याकरिता केस दाखल करायला सांगा. यावर गोट्या सावंत यांनी तुम्ही वेळ काढण्याची भूमिका घेता असा आरोप केला. तर या दरम्यान दाखल झालेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी सदर रस्ता हा ग्रामपंचायतीच्या मालकीचा नाही अशी भूमिका घेतली. काही असले तरी या रस्त्याच्या पलीकडचे बाजूला असलेल्या लोकांनी जायचं कसं? मला मार्ग काढून द्या. पर्याय कसा काढायचा हे तुम्ही बघा. अशी भूमिका आमदार नितेश राणे यांनी घेतली. रस्त्यावर अतिक्रमण झालं असेल तर ते ग्रामपंचायत ने हटवल पाहिजे अशी प्रांताधिकारी कातकर यांनी सांगितले. रस्त्यावर जर अतिक्रमण हटवायला सरपंच उपसरपंच गेले तर लगेच गुन्हे दाखल केले जातात असे श्री. सावंत यांनी सांगितले. या लोकांना रस्ता देण्यासाठी माहिती घ्या. मोजणी करा अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी दिली. तर या रस्त्यासाठी शाळेने चार फूट जागा सोडलेली आहे. त्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. अनधिकृत इमारतीवर कारवाई करायची असेल आम्ही ठराव देतो. पैसे भरायचे असतील तर ग्रामपंचायत भरेल. लागणारे ठराव देतो. पोलीस बंदोबस्त घेऊन प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम तोडा अशी भूमिका गोट्या सावंत यांनी घेतली. ज्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम आहे त्या बांधकामामध्ये बँक ठेवलेली आहे. असे यावेळी उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले. अनधिकृत काम होत असेल तर एसीबीची कारवाई तुमच्यावर झाली पाहिजे असा इशारा तेथील ग्रामसेवकाला आमदार नितेश राणे यांनी दिला. यावेळी आमदार नितेश राणे यांचा सोबत माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी सभापती सुरेश सावंत, बाबू वाळके , सुरेश सावंत, संजय चव्हाण, किरण चव्हाण, मारुती मोहिते,दिलीप पवार,प्रकाश पवार, शिवाजी पवार, तुकाराम जाधव, जनार्दन जाधव,सागर जाधव, सुखदेव जाधव,परशुराम मोहिते, सोमनाथ मोहिते, दादा पवार, संदीप पवार, मयुर पवार, संतोष जाधव, सुरेश जाधव, विष्णू भंडारे, लवू चव्हाण, निलेश गुरव, अनिल मगदूम, जितेंद्र चव्हाण, प्रदीप मोहिते, बबन मोहिते, प्रणय केळूसकर, पुष्पा पवार,संगीता पवार, माधवी पवार, नीता जाधव, सुनीता जाधव, सरिता चव्हाण, सरिता पवार, शालिनी मगदूम, उषा जाधव, आरती जाधव, सुवर्णा मोहिते,सवित्री भंडारे, लक्ष्मी जाधव, आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा