You are currently viewing पर्यटन व्यवसायात रोजगार निर्माण करण्याची खरी ताकद-बाबा मोंडकर

पर्यटन व्यवसायात रोजगार निर्माण करण्याची खरी ताकद-बाबा मोंडकर

सावंतवाडी तालुक्याच्या व्यावसायिक पर्यटन महासंघाची बैठक संपन्न

सावंतवाडी
पर्यटन व्यवसायात रोजगार निर्माण करण्याची खरी ताकद हीअसून उपलब्ध नैसर्गिक साधनसुविधांचा सदुपयोग करून जिल्ह्याचे पर्यटन हे जगाच्या नकाशावर नेऊया, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसायिक पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले.
सावंतवाडी तालुक्याच्या व्यवसायिक पर्यटन महासंघाची बैठक सावंतवाडी येथे डि.।के. टुरिझम येथे पार पडली. सुरुवातीला सावंतवाडी तालुक्याचे संघाचे अध्यक्ष म्हणून हाँटेल व्यवसायिक श्री जितेंद्र पंडित यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपस्थित सर्वानी त्याला एकमताने मान्यता दिली.

श्री जितेंद्र पंडित यांनी आपण सर्वानी एकजुटीने आणि परस्पर सहकार्याने पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करूया, असे आवाहन केले. सावंतवाडी तालुक्याचे उपाध्यक्ष आणि पर्यटन क्षेत्रातील जेष्ठ व अनुभवी व्यवसायिक श्री डि. के. सावंत यांनी या व्यवसायातील समस्या आणि त्याचे निराकरण करण्यासाठी करावयाची उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष श्री सतीश पाटणकर यांनी या संघाचे व्यापक स्वरुप असून फक्त व्यवसायिकच सभासद नसून या क्षेत्राची आवड असणारा कुणीही व्यक्ती या चळवळीत सामील होवू शकते. समाजातील सर्व घटकांना घेऊन ही चळवळ गतिमान आणि प्रभावशाली करण्याचा मनोदय व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा व्य.पर्यटन महासंघाचे सचिव अँड.नकुल पार्सेकर यांनी पर्यटन व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजना आणि त्या मिळवता येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी शासकीय स्तरावर एकत्रितपणे प्रयत्न करण्याबाबत तसेच पर्यटन व्यवसायिका़साठी तज्ञाना निमंत्रित करुन कार्यशाळा घेण्याबाबत संघ आग्रही असल्याचे सांगितले.

बैठकीचा समोरोप श्री विनोद रेडकर यानी केला. बैठकीला सोशल मिडिया प्रमुख श्री किशोर दाभोलकर, श्री राजू लाड, सुधीर पराडकर, श्रीराम कांबळी, प्रतिक बांदेकर, सौ. कविता नाईक, सौ.दिव्या वायंगणकर, सौ.मार्सेलिन फर्नांडिस, शामसुंदर नाईक, लक्ष्मण पारकर, राजन नाईक, दयानंद काळसेकर, ऋषिकेश वाडकर, जगन्नाथ देवस्थळी, इ.पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + seven =