You are currently viewing ग्रामपंचायतीची आज होणार कसून चौकशी; लेखा परिक्षणाच्या गोंधळाचा पर्दाफाश..

ग्रामपंचायतीची आज होणार कसून चौकशी; लेखा परिक्षणाच्या गोंधळाचा पर्दाफाश..

जिल्हयात ग्रामपंचायती मध्ये बदली झाल्यानंतर रेकॉर्ड गायब होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याचे दिसून येत आहे. झालेले गैरव्यवहार उघडकीस येऊ नये म्हणून अनेक ग्रामसेवक लेखापरीक्षण ही घेऊ देत नाहीत. अशा प्रकारांबद्दल तपोवन तालुका मोताळा या ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण का झाले नाही? या बाबतची चौकशी 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या सगळ्या प्रकारात बदलीनंतर पदभार सोडताना रेकॉर्ड न देणारे ग्रामसेवक अखेर गावकऱ्यांच्या लक्षात येत असल्याने तक्रारीचा ओढा वाढला आहे. बुलढाणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या येळगाव व देऊळघाट येथील प्रकरण सध्या जिल्हाधिकारी यांचे समोर सादर करण्यात आले आहे तर आता नव्याने साखळी बु. या ग्रामपंचायतीचे प्रकरणे जिल्हाधिकारी यांचे समोर ठेवले गेले.

 

तपोवन तालुका मोताळा या ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण गेल्या 4 वर्षापासून झाले नसल्याचे दैनिक वृत्तपत्रातून समोर आणले होते. दरम्यान या प्रकरणाची चौकशी व तक्रारही करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 3 =