You are currently viewing शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान साठी अभय आजगावकरांचे २६ ला आमरण उपोषण…

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान साठी अभय आजगावकरांचे २६ ला आमरण उपोषण…

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान साठी अभय आजगावकरांचे २६ ला आमरण उपोषण…

बांदा

राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र अजूनही काही शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे प्रोत्साहन तात्काळ मिळावे यासाठी इन्सुली येथील शेतकरी अभय आजगावकर यांनी २६ जानेवारीला सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी कर्जमाफी योजना दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले. पैकी काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला. मात्र बहुतांशी शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान वितरित करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आहे.

प्रोत्साहन योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना २५ जानेवारी पर्यंत प्रोत्साहन अनुदान रक्कम खात्यावर वितरित न केल्यास प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय अभय आजगावकर यांनी घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा