You are currently viewing शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची कुमारी अस्मि घाडी जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत प्रथम

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची कुमारी अस्मि घाडी जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत प्रथम

*शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची कुमारी अस्मि घाडी जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत प्रथम*

*सिंधुदुर्ग*

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी या गटात शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची कुमारी अस्मि सदानंद घाडी या विद्यार्थिनी ने प्रथम क्रमांक प्राप्त केला. जिल्हास्तरीय हिंदी शिक्षक संमेलनात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद अध्यक्ष सन्मा. श्री प्रमोद कामत यांच्या शुभहस्ते तिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले यावेळी विवेक मासिकचे श्री अमोल पेडणेकर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री सुमन दळवी सिंधुदुर्ग जिल्हा पतपेढीचे अध्यक्ष श्री समीर परब सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री कैलास जाधव हिंदी अध्यापक मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री पंडित माने हिंदी अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष श्री दीपक तारी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. आश्लेषा पारकर आदी उपस्थित होते. तिच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी संस्था सचिव श्री प्रदीप प्रभू तेंडोलकर सर्व संस्था संचालक व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार तसेच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री उमेश प्रभू तेंडोलकर यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा