आमदार वैभव नाईक यांच्याच प्रयत्नामुळे मच्छिमारांना आर्थिक पॅकेजचा लाभ

आमदार वैभव नाईक यांच्याच प्रयत्नामुळे मच्छिमारांना आर्थिक पॅकेजचा लाभ

पारंपारिक मच्छिमारांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे आभार

सिंधुदुर्गसह महाराष्ट्र किनारपट्टीवर गेल्या काही वर्षातील मत्स्य दुष्काळ स्थिती, सतत येणारी नैसर्गिक आपत्ती यामुळे मोठ्या संकटात सापडलेल्या मच्छीमार बांधवांचे प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने विधिमंडळ व मंत्रालय स्तरावर मांडले. याचीच दखल घेत महाराष्ट्र शासनाने ६५ कोटींचे मत्स्य दुष्काळ पॅकेज घोषित केले आहे. खऱ्या अर्थाने छोट्या मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे. असे सांगत मालवण, सिंधुदुर्गातील पारंपारिक मच्छिमार शिष्टमंडळाने आमदार वैभव नाईक यांची कणकवली निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले.

दरम्यान, छोट्या मच्छीमाराना खऱ्या अर्थाने थेट लाभ मिळवून देणारे राज्य शासन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मत्स्यमंत्री अस्लम शेख, पालकमंत्री उदय सामंत यासह खासदार विनायक राऊत यांचेही मच्छीमार शिष्टमंडळाने आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी सिंधुदुर्ग श्रमजीवी रापण संघाचे दिलीप घारे, मच्छीमार नेते बाबी जोगी, श्रमिक मच्छीमार अन्वय प्रभू, संमेश परब, रश्मीन रोगे, रुपेश प्रभू यासह मच्छीमार उपस्थित होते.

दरम्यान, यांत्रिकी-बिगर यांत्रिकी नौकाधारक मच्छिमारांना पॅकेजचा लाभ मिळण्यासाठी किसन क्रेडिट कार्ड अट घालण्यात आली आहे. अशी माहिती आहे. मात्र अनेकांकडे किसन क्रेडिट कार्ड नाहीत तरी ही अट रद्द करावी, तसेच मत्स्य विक्रेत्या महिलांना लाभ देताना काही अटी लाभ मिळण्यापासून वंचित ठेवणाऱ्या असतील तर त्या दूर कराव्यात. अगदी शेवटच्या मच्छिमारांपर्यंत आपण पॅकेजचा लाभ मिळवून द्याल हा आम्हा मच्छिमारांना विश्वास आहे. यापूर्वीही पारंपरिक मच्छीमाराना आपण न्याय मिळवून दिला आहे. असे सांगत मच्छीमार प्रतिनिधीनी आमदार वैभव नाईक यांना आभार पत्र दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा