पटकीदेवी कला क्रीडा मंडळाची अणाव, असलदे येथील वृद्धाश्रमाला मदत….

पटकीदेवी कला क्रीडा मंडळाची अणाव, असलदे येथील वृद्धाश्रमाला मदत….

कणकवली

शहरातील सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणार्‍या पटकीदेवी कला-क्रीडा मंडळाने असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम आणि अणाव येथील जीवन संजीवन येथील वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. या मंडळातर्फे नुकत्याच क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या निमित्ताने जमा झालेल्या रक्कमेतून ही मदत करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा