You are currently viewing १२ वी नंतर काय?हॉटेल मँनेजमेंट शेत्रात डिग्री करायची संधी मार्गदर्शन शिबिर….

१२ वी नंतर काय?हॉटेल मँनेजमेंट शेत्रात डिग्री करायची संधी मार्गदर्शन शिबिर….

बाबा मोंडकर, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ.

कोकणचा कॅलिफोर्निया होणार हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठीचा तो दिवस लांब नाही असे म्हणण्या मागचे कारण म्हणजे काही वर्षातच कोकणचा झालेला कायापालट. कोकणावर निसर्गाची मुक्त उधळण ही कोकणच्या सांस्कृतिक विकासात अधिकच भर पाडते.
सिंधुदुर्ग जिल्हा देशात पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला ही प्रत्येक सिंधुदुर्ग वासीयांसाठी  अभिमानाची गोष्ट होती. त्यानंतर पर्यटकांची पावले सिंधुदुर्गाकडे वळायला सुरुवात झाली आणि कोकणाला सुगीचे दिवस सुरू झाले. सिंधुदुर्गात काही प्रमाणात छोटे-मोठे उद्योग होतेच शेती आणि मासेमारी पारंपारिक आणि मुख्य व्यवसाय त्यालाही आधुनिकतेची जोड मिळाली आणि सिंधुदुर्ग म्हणजे पर्यटन हे एक वेगळेच समीकरण निर्माण झाले.
जिल्ह्यात वाहतुकीची मोजकीच साधने होती उदा. बस, सायकल,बैलगाडी इ. परंतु हे चित्र पालटले आपल्याला दिसते. सिंधुदुर्गात रेल्वे आली विमानतळ तयार झाले नॅशनल हायवे तयार झाले गावागावात वाडी पाड्यापर्यंत रस्ते पोहोचले आणि पर्यटनाला एक वेगळीच दिशा मिळाली.
पर्यटना सोबत एका व्यवसायाने नवीन ओळख निर्माण करून दिली तो व्यवसाय म्हणजे हॉटेल व्यवसाय. गाड्यावर मिळणाऱ्या वडापाव ची जागा बर्गरने कधी घेतली ते कळलेच नाही. पारंपारिक चुलीवरच्या जेवणाला नावीन्याची जोड मिळाली समुद्रकिनाऱ्यावर छोट्या छोट्या टपऱ्यांची जागा तारांकित हॉटेल्स घेत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर रिसॉर्ट हॉटेल व्यवसायानी अल्पावधीतच एक वेगळी ऊंची गाठली आहे. नॅशनल हायवेवर ढाबा संस्कृती उदयास आली.
हॉटेल व्यवसाय शेती आणि मासेमारी म्हणून ओळख असलेले संस्कृती पूर्णतः बदलून टाकली. हॉटेल व्यवसायामुळे मुंबई पुण्याकडे जाणारा तरुण वर्ग गावातच स्थिरावला. छोट्या गाड्या पासून ते मोठ्या हॉटेल पर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या त्यामुळे बेरोजगारी कमी झाली तसेच स्वयंरोजगाराला चालना मिळाली आणि अर्थकारण बदलले.
खाद्यसंस्कृतीच्या  बाबतीत कोकणची वेगळीच ओळख आहे. हॉटेल मॅनेजमेंट सारख्या कोर्ससाठी यापूर्वी मुलांना गोवा,,मुंबई, पुणे तसेच देशाच्या इतर ठिकाणी जावे लागायचे परंतु आपल्या जिल्ह्यात या कोर्सची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हॉटेल साठी लागणारा कर्मचारी वर्ग बाहेरून आयात करावा लागत नाही. तसेच विद्यार्थ्यांना परदेशातही नोकरी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. हॉटेल व्यवसायाने तरुण पिढीला दिशादर्शक म्हणूनच काम केलेले आहे. अश्या विषयी मोफत मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक २९/०८/२१ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता हॉटेल श्री महाराज येथे आयोजित केले आहे तरि १२वी पास विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावे अशी विनंती श्री. बाबा मोंडकर ,अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा