वाट तुझी पाहत होतो…..

वाट तुझी पाहत होतो…..

वाट तुझी पाहत होतो
त्या चातक पक्षागत…
बरसून तू गेलीस जणू
पारिजाताच्या फुलागत…

सुहास स्पर्शून गेला मना
पहाटेच्या मंद वाऱ्यागत…
रूप तुझं न्याहाळत होतो
पौर्णिमेच्या मोहक चंद्रागत…

हासून गेलीस तू समोरून
श्रावणातल्या पावसागत…
चिंब चिंब झाले मन
तुषार झेलल्या पानागत…

हवेत उडती केस तुझे
नाजूक मऊ रेशमागत…
त्या केसांतून फिरता बोटे
शहारतेस तू लाजाळूगत…

हात घेता हाती तुझा
कळी खुलते मोगऱ्यागत…
बिलगशी तू मजसी जणू
सागरातल्या सरितेगत…

दिपी
(दीपक पटेकर)
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा