येत्या काही दिवसात उर्वरित रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ : रुपेश राऊळ….

येत्या काही दिवसात उर्वरित रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ : रुपेश राऊळ….

पारपोली-गुरववाडी रस्ता नूतनीकरण भूमीपूजन सोहळा

सावंतवाडी

पारपोली गावामध्ये अनेक विकास कामे गेल्या पाच वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहेत. सदर रस्ता हा माननीय आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून २५-१५ अंतर्गत मंजूर केला असून त्यासाठी संदेश गुरव, राघोजी सावंत यांनी प्रयत्न केल्यामुळे होऊ शकला. येत्या काही दिवसात उर्वरित रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिले. पारपोली-गुरववाडी रस्त्याचे नूतनीकरण शिवसेनेच्या माध्यमातन करण्यात आले. भूमीपूजन सोहळा सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी उपसरपंच संदेश गुरव, विद्यमान सरपंच रेश्मा गावकर एकनाथ परब, हेमंत परब, गौरेश तेजम, परशुराम परब, मोहन परब, शंकर परब, गजानन डांगी, शशिकांत परब, भगवान गुरव, गंगाराम गुरव, रामचंद्र गुरव आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पारपोली गावाच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचेही रुपेश राऊळ यांनी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा