You are currently viewing पणदूरातील संविता आश्रमाला कोरोनाकाळात देव्या सूर्याजी ग्रुप व अवधूत गावडे यांची मदत..

पणदूरातील संविता आश्रमाला कोरोनाकाळात देव्या सूर्याजी ग्रुप व अवधूत गावडे यांची मदत..

पणदूर :

पणदूर मधील संविता आश्रमाला कोरोनाच्या पाश्वभूमीवर तातडीची गरज ओळखून देव्या सूर्याजी ग्रुप व अवधूत गावडे मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने मदत करण्यात आली. कोरोनाच्या कठीण काळात आश्रमाला मदत करण्याच आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, अवधूत गावडे, प्रशांत मेस्त्री, आशिष साखळकर, तेजस बांदीवडेकर, बाबाजी कांडरकर,‌ यशवंत परब, बंटी वराडकर, दिपेश परब, योगेश पारकर, सुप्रिया मोडक, रवी मालवणकर, दिपाली दळवी, मनोहर ठिकार, शैलेश सावंत, मिनल पंडीत, सुधीर मातोंडकर, जॅक्सन डान्टस, राजन चव्हाण, गोविंद आजगावकर, विवेक जंगम, पिंट्या सावंत, घनःश्याम वालावलकर, दत्तगुरु कांबळी, रवी चव्हाण, जितेंद्र शिरोडकर, अनिकेत सुकी, मधुकर भाईडकर, अनिका सुकी, विनेश तावडे, मिलिंद चोणकर, नितेश सावंत,महेश आचरेकर, राजेंद्र करंगुटकर, तुषार वेंगुर्लेकर, प्रथमेश मुरगोड, श्री स्वामी समर्थ(रत्नागिरी), आदित्य गवळी, श्री स्वामी समर्थ सावंतवाडी, शुभम सुकी, अमिर खान, सागर पोकळे, शैलेजा कामत, विठोबा शेडगे, दिलीप कामत, विकास तेंडोलकर यांनी मदतीचा हातभार लावला.

४५ हजार हून अधिक मदतीची रक्कम यात जमा झाली. या पैशातून रुग्णांसाठी डायपर २५० पीस, सेनीट्री पॅड १०० पीस, जीवनावश्यक वस्तू, धान्य, १० टिफीन आदींची मदत संविता आश्रम ला करण्यात आली. यावेळी संविता आश्रमचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, अवधूत गावडे, संदीप निवळे, राघवेंद्र चितारी,आशिष साखळकर, यशवंत परब आदी उपस्थित होते. यावेळी संदिप परब यांनी आपले सहकार्य कायम असते ते असेच राहावे म्हणून आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा