You are currently viewing सावंतवाडीतील श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड देऊळवाडी या मंडळाचे युवा सदस्य मयूर माळकर यांचे आकस्मिक निधन..

सावंतवाडीतील श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड देऊळवाडी या मंडळाचे युवा सदस्य मयूर माळकर यांचे आकस्मिक निधन..

शिवजयंती निमित्त नियोजित स्पर्धा कार्यक्रम रद्द करण्याचा  मंडळाचा निर्णय..

 

सावंतवाडी :

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मळेवाड येथे श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ मळेवाड देऊळवाडी या मंडळाने विविध मैदानी स्पर्धानच आयोजन केल होत. यामध्ये शैक्षणिक शालेय स्तरावर भाला फेक स्पर्धा, गोळा फेक स्पर्धा, थाळी फेक स्पर्धा तसेच खुल्या गटामध्ये रस्सीखेच स्पर्धा आणि गाव मर्यादित महिलांची रस्सी खेच स्पर्धा या खेळांचा समावेश होता.

याच मंडळाचा एक उमदा आणि युवा सदस्य मयूर दशरथ माळकर, वय वर्ष ३६ यांचं अचानक हृदय विकाराने शनिवार दि. ११ फेब्रुवारी रोजी दुःखत निधन झालं आणि गावात एक शोककळा पसरली. मंडळाच्या शिवजयंती नियोजित कार्यक्रम आणि मैदानी स्पर्धा यामध्ये मयूर माळकर याचा मोठा सहभाग होता. मंडळातील या दुःखत प्रसंगी कार्यक्रमांच आयोजन करण ही मानसिक वेदनादाई बाब लक्षात घेऊन मंडळाची कार्यकारणी, वरिष्ठ सभासद आणि मयूर यांच्या मित्र मंडळींनी  नियोजित स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय मंडळाच्या मिटिंग मध्ये घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =