केशवनगर चिंचवड –
सौ. आरती सुनील कोशे, भूषण सुनील कोशे यांनी मोरया गोसावी यांच्या पदस्पर्श ने पावन झालेल्या चिंचवडच्या पुण्यभूमीत, सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांच्या कृपेनें नवे आदिशक्ती स्नॅक्स सेंटर सुरु केले.
चिंचवड गावातून काळेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कल्याण प्रतिष्ठान ( सुखी भवन ) शेजारी हे “आदिशक्ती स्नॅक्स सेंटर अँड लंच होम” सुरू झाले आहे.
कामगार बहुल तसेच मध्यमवर्गीय वस्ती असल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार दर्जेदार व परवडणाऱ्या दरात स्नॅक्स आणि जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही आदिशक्ती महिला दिनानिमित्त सुरू झाली आहे.
साहित्यिक पत्रकार बाबू डिसोजा त्यांच्या पत्नी व्हिडिओ जर्नालिस्ट सौ.माधुरी डिसोजा कुमठेकर विशेष निमंत्रित होते.आसपासचे नागरिक, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते, कार्यकारी सदस्य याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
