You are currently viewing कणकवलीत आरटीओ कॅम्पला विरोध…समीर नलावडे

कणकवलीत आरटीओ कॅम्पला विरोध…समीर नलावडे

गर्दी झाल्यास कोरोना संसर्गाची भीती…

कणकवली प्रातिनिधी :
कणकवली शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. सध्याच्या परिस्थितीत एका ठिकाणी गर्दी झाल्यास आणखीन संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे कणकवली एसटी वर्कशॉप समोर येथे होत असलेल्या आरटीओ कॅम्पला आमचा विरोध असेल, अशी भूमिका नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केली आहे.
कणकवलीत आरटीओ कॅम्प उद्या होत असल्याची माहिती समजली. त्यानुसार ककणकवली शहरात हा कॅम्प होऊ नये यासाठी नगरपंचायतचे कर्मचारी त्याठिकाणी असतील. चुकीच्या पद्धतीने गर्दी केल्यास त्यावर कारवाई होईल. त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कॅम्प घेऊ नये. ज्याप्रमाणे सावंतवाडी व मालवण मध्ये आरटीओ कॅम्प रद्द केला, त्याच प्रमाणे कणकवलीतील कॅम्प तातडीने रद्द करावा अन्यथा उद्या संसर्ग वाढल्यास संबंधित आरटीओ अधिकारी जबाबदार असतील असे समीर नलावडे यांनी सांगितले.
या कॅम्पमध्ये कणकवली, वैभववाडी, देवगड व मालवण या तालुक्याततुन नागरिक येण्याची शक्यता आहे. कामे असल्याने नागरिक गोळा होतील, त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसेल अशी भीती समीर नलावडे यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =