धनगर युवा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचे सिंधुदुर्गातील समाज बांधवांकडून जंगी स्वागत….

धनगर युवा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचे सिंधुदुर्गातील समाज बांधवांकडून जंगी स्वागत….

तळेरे

धनगर समाज नेते तथा धनगर समाजाचा बुलंद आवाज आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे सिंधुदूर्ग जिह्यामध्ये प्रवेश होताच तळेरे ता.कणकवली येथे कणकवली तालुक्यातील धनगर समाज कार्यकर्ते राजेंद्र माने यांनी त्यांचे जंगी स्वागत करीत व समाजाच्या काही प्रमुख मागण्यांचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांना सादर केले.


याप्रसंगी राज्यातील धनगर समाजाचाचे प्रमुख पदाधिकारी शिवदास बिडगर,अशोक पातोंड,मंगेश गोरे, प्रशांत आखाडे यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी आम. पडळकर यांच्या सोबत उपस्थित होते.आम. पडळकर यांचा सलग तीन दिवस कोकण दौरा सुरू होता. या दौ-यातील सिंधुदुर्ग हा अंतिम जिल्हा होता. सोमवारी स.९वा
तळेरे येथे आम. पडळकर यांचे आगमण होताच धनगर समाज कार्यकर्ते राजेंद्र माने यांनी आम. गोपीचंद पडळकर यांचे शाल व पुष्पहार घालून कोकणातील सिंधुभुमित धनगर समाजाच्यावतीने जंगी स्वागत केले.

याप्रसंगी पत्रकार दत्तात्रय मारकड, निकेत पावसकर यांच्यासह कार्यकर्ते गंगाराम माने, गणेश माने, संतोष पटकारे,अशोक पटकारे,गणेश पटकारे, यांच्या सह अन्य समाज बांधव उपस्थित होते. स्वागत सोहळ्यानंतर आम. गोपीचंद पडळकर वैभववाडीच्या दिशेने रवाना झाले.त्यांनी आज दिवसभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी,नापणे,तळेबाजार,कणकवली, दोडामार्ग, यासह विविध ठिकाणी आपल्या समाज बांधवांच्या भेटी घेत त्यांची गा-हाणी ऐकून घेत त्यांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन ही आम.पडळकर यांनी दिले. आम. पडळकर यांच्या जिल्ह्या दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजाचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

तळेरे: धनगर समाजाचे नेते तथा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे सिंधुदुर्गातील तळेरे ता.कणकवली येथे स्वागत करताना तालुक्यातील धनगर समाजाचे कार्यकर्ते राजेंद्र माने सोबत राज्यभरातून आलेले धनगर समाजाचे पदाधिकारी व धनगर समाज बांधव

प्रतिक्रिया व्यक्त करा