You are currently viewing शिरोडा ग्रामपंचायत मध्ये “माझी वसुंधरा” उपक्रम उत्साहात साजरा…

शिरोडा ग्रामपंचायत मध्ये “माझी वसुंधरा” उपक्रम उत्साहात साजरा…

वेंगुर्ले
शिवजयंती व रथसप्तमी चे औचित्य साधून शिरोडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून महिलां साठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी ” माझी वसुंधरा ” उपक्रमा अंतर्गत उपस्थित महिलांना शिरोडा सरपंच मनोज उगवेकर व महिला सदस्यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले तसेच “माझी वसुंधरा” उपक्रमा विषयी ग्रामविकास अधिकारी श्री. सुनील चव्हाण यांच्या कडून मार्गदर्शन करण्यात आले.
शिरोडा ग्रामपंचायत येथे मागील वर्षी पासून सुरु करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवा नुसार या वर्षी ही ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना महामारी अंतर्गत विशेष काळजी घेऊन व गर्दीवर नियंत्रण ठेऊन शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे व राजमाता जिजाऊं च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यालयात शिवराज्याभिषेक प्रतिमेचे अनावरण करून उपस्थित सदस्य, मान्यवर व कर्मचारी यांनी महाराजांचा जयघोष करून संपूर्ण परिसर शिवमय केला. या कार्यक्रमावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + fifteen =