दत्ता सामंत यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती

दत्ता सामंत यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती

वाढदिवसाला पक्षाकडून भेट,चंद्रकांतदादांची घोषणा

कणकवली
भाजपा चे जेष्ठ पदाधिकारी आणि कट्टर राणे समर्थक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी तशी घोषणा केली.जिल्हा परिषद,पंचयत समिती पदाधिकारी,सदस्य यांच्या बैठकी दरम्यान दत्ता सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नव्या पदाची भेट दिली.यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली,अतुल काळसेकर,यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा