You are currently viewing “शूर प्रतापी राजा छत्रपती”

“शूर प्रतापी राजा छत्रपती”

“शूर प्रतापी राजा छत्रपती”

पुत्र तो जिजाऊचा,
ज्याने स्वराज्य उभारीले.
हिंदवी स्वराज्य उभारीले….!!
शिकवण ती जिजाऊंची,
ज्याने शिवबा घडविले..
दादोजी कोंडदेवनी त्यास,
तलवारबाजी शिकविले..
मावळा साथीस घेऊनी,
स्वराज्याचे झेंडे रोविले..!!
पुत्र तो…

गड किल्ले त्यांनी पराक्रमाने
स्वराज्यात आणिले..
रयतेच्या रक्षणा शिवबा,
शत्रूंवर तुटूनी पडले..
रयतेचा जाणताराजा म्हणुनी
इतिहासात संबोधिले..!!
पुत्र तो…

शायिस्तेखानास अंधारात त्यांनी
बोटं छाटून पळविले..
अफजलखानास गळा भेटुनी,
त्यांनी जमिनीवर लोळविले..
मोघल साम्राज्यास ते दिवसारात्री,
स्वप्नातही दिसू लागले..!!
पुत्र तो….

पराक्रम गाजवुनी त्यांनी,
स्वराज्य वाढविले..
महापराक्रमी शूरप्रतापी राजा,
शिवबाचे छत्रपती जाहले..
पुत्र तो जिजाऊचा,
ज्याने स्वराज्य उभारीले..
हिंदवी स्वराज्य उभारीले..!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + nine =