राधाकृष्ण मंदिरात प्रचार शुभारंभ; अनंत पिळणकरांचा विजयाबाबत ठाम विश्वास
उमेदवारांच्या प्रचाराला जनतेचा भरघोस प्रतिसाद
कणकवली/ फोंडा (विभावरी परब) :
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गंगाराम पिळणकर आणि फोंडा पंचायत समितीचे उमेदवार चैतन्य सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ राधाकृष्ण मंदिरात मोठ्या उत्साहात झाला. असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते अबू पटेल, अनिल पटेल, सुरेश टक्के, शिवसेना तालुका प्रमुख माधवी दळवी, सौ. प्रतिभा अवसरे, संजना कोलते, राष्ट्रीय काँग्रेसचे संतोष टक्के, शिवसेना–राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, विभाग प्रमुख सिद्धेश राणे, शिवसेनेचे लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, राष्ट्रवादी विभाग प्रमुख रमेश राणे यांच्यासह तुषार पिळणकर, उत्तम रेवडेकर, उत्तम तेली, राजू वाघाटे, प्रीतम राणे, बाळा मसुरकर, गणेश कुंभार, गणपत पाटकर, अमित लाड, दिलीप चव्हाण तसेच महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना अनंत गंगाराम पिळणकर म्हणाले, “मला राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्हावर, तर उबाठाचे चैतन्य सावंत यांना मशाल चिन्हावर उमेदवारी मिळाली आहे. सकाळपासून सर्व सहकारी माझ्यासोबत प्रचारात सक्रिय आहेत. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात माझा विजय निश्चित होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. गेली २० वर्षे येथील जनता माझे सामाजिक कार्य ओळखते. त्यामुळे येथील मायबाप जनता मला विकासासाठी संधी देईल. जनतेकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.”
