You are currently viewing सावंतवाडीतील गांजा प्रकरणातील आरोपींच्या इन्सुलित झडायच्या पार्ट्या..

सावंतवाडीतील गांजा प्रकरणातील आरोपींच्या इन्सुलित झडायच्या पार्ट्या..

गांजा प्रकरणाचे केरळीयन कनेक्शन?

सावंतवाडीत गाजत असलेलं गांजा प्रकरण हे नवीन नाही, गेली काही वर्षे याची कुणकुण लागत होती, परंतु जाणीवपूर्वक की का त्याच्यावर दुर्लक्ष केला जायचा हे मात्र गुलदस्त्यात आहे. एलसीबीने गांजा प्रकरणाचा सुगावा लागतात अगदी काटेकोरपणे लक्ष ठेऊन गांजा वाहतूक, विक्री करणाऱ्या तरुणांना रंगेहात पकडत त्यांच्याकडून गांजा जप्त करत या प्रकरणात सामील असणाऱ्या मुख्य सुत्रधारांकडे मोर्चा वळविला. यात मयुरेश कांडरकर व कुलकर्णी नामक तरुणांना गांजा वाहतूक करताना गाडीसहित ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अतुल उमेश गवस ला बोलते करत बॉबी बेग या गांजा पुरवठा करणाऱ्या तरुणाचा शोध घेताना त्याच्या बंद घरातील सेल्फ वरून साधारणपणे ३ किलो गांजा जप्त करण्यात आला. परंतु पोलीस पोचायच्या आधीच बॉबी फरार झाला होता. पोलिसांच्या भीतीने फरार असणारा बॉबी तिसऱ्या दिवशी कुडाळ पोलिसांना शरण आला.
बॉबी बेग पोलिसांना शरण आल्यामुळे गांजा प्रकरणात मुख्य सूत्रधार असणारे मात्र धास्तावले आहेत. बॉबी हा एक प्यादा असू शकतो परंतु गांजा बॉबीपर्यंत पोचवणारा कोणीतरी बडा व्यक्ती असून तो मात्र अजून पडद्यासमोर आलेला नाही. परंतु बॉबी पोलिसांच्या ताब्यात असल्याने लवकरच मुख्य आरोपी देखील सापडेल अशी आशा आहे.
गांजा प्रकरणात सहभागी असणारे तरुणांचे टोळके नेहमी पार्ट्या झोडायचे. इन्सुली क्षेत्रफळवाडीत एक स्लॅबच्या बंद घरात या पार्ट्या व्हायच्या. गेले चार दिवस गांजा प्रकरण उजेडात आल्यापासून इन्सुली येथील पार्ट्या होणारे हे घर सुनेसुने झाले आहे. एकंदरीत पार्ट्या होणाऱ्या या घरात असणाऱ्या तरुणांच्या वावरावरून या गांजा प्रकरणाचे केरळीयन कनेक्शन असल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, अननस, रबर आदी उत्पादन घेण्यासाठी डोंगरावर, आडरानात जिथे पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे तिथे हे काही केरळीयन लोक जागा विकत अथवा भाडे तत्वावर घेतात व केळी, अननस, रबर इत्यादींच्या आडून गांजा लागवड देखील करून अवैध धंद्याच्या आडून श्रीमंत होतात. असेच पैसेवाले लोक अवैद्य धंदे करणाऱ्या व्यापाऱ्याला हाताशी धरून गांजा सारखे अंमली पदार्थ ग्राहकांपर्यंत पोचवतात आणि समाज पोखरणारे धंदे करतात.
सावंतवाडीत पोलिसांनी पकडलेल्या तरुणांकडून योग्य ती माहिती घेऊन आपल्या शहरातील, जिल्ह्यातील तरुणांना नशेच्या आहारी नेणाऱ्या मुख्य सुत्रधाराची पाळेमुळे खणून काढून लवकरात लवकर अटक करावी आणि जिल्ह्यातील बिघडणार भावी पिढी वाचवाची अशी मागणी होऊ लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =