नितेश राणे यांच्या ‘सुवर्णगड’ शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग; परिसरात खळबळ
मुंबई
राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुंबई येथील ‘सुवर्णगड’ या शासकीय निवासस्थानाबाहेर एका अज्ञात इसमाने संशयास्पद बॅग ठेवल्याची घटना घडली असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसर निर्मनुष्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता बॉम्बशोधक पथक व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून संशयास्पद बॅगेची सखोल तपासणी सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून तपासानंतरच घटनेबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.
