ऊस शेतकऱ्यांसाठी प्रमोद रावराणे यांनी ‘ही’ केली मागणी…

ऊस शेतकऱ्यांसाठी प्रमोद रावराणे यांनी ‘ही’ केली मागणी…

वैभववाडी प्रतिनिधी

तालुक्यातील ऊस शेतकऱ्यांच्या विविध अडचणी संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी आ.नितेश राणे यांना निवेदन दिले. ऊस शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. रावराणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांचा ऊस पाळीपत्रकानुसार तोडण्यात यावा,ऊस कामगारांची एंट्री ही जी जाचक अट आहे ती पुर्णतः बंद करण्यात यावी, ऊस शेतकऱ्यांना दिली जाणारी साखर ही वेळेत व उच्च प्रतिची दिली जावी, साखर कारखान्याचे कार्यालय शहरात स्थलांतरित कराव अशा मागण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना लागवडीसह ऊस शेतीच्या संगोपनासाठी कारखान्याकडून गावनिहाय मार्गदर्शन करण्यात याव, तालुक्यातील १००शेतकऱ्यांची थ्री फेज विद्युत जोडणी देणे प्रलंबित आहे ती तात्काळ मिळावी, ऊस वाहतूक करण्यासाठी तालुक्यातील सर्व रस्तांची डागडुजी करण्यात यावी, ऊस शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्यासाठी तालुक्यातील धरणांच्या कालव्यांची कामे तात्काळ सुरू करावीत, अर्धवट स्थितीत असलेल्या तालुक्यातील अन्य धरणांच्या कामांना तात्काळ मंजुरी द्यावी , ऊस संशोधन केंद्राच्या प्रत्यक्ष कामाला त्वरित सुरुवात करण्यात यावी अशा विविध मागण्या रावराणे यांनी आ.राणे यांच्याकडे केल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा