*सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रदीप सावंत यांचा सत्कार*
*वेंगुर्लेत तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी प्रदिप सावंत यांचा केला सत्कार.*
*पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा —- प्रसंन्ना देसाई.*
वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज (६ जाने) पत्रकार दिन निमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, पत्रकार दिन साजरा करण्यात आला .
यावेळी मान्यवरांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना , पत्रकार हा समाजाचा आरसा असतो असे म्हणाले , कारण आरसा जसा खरा असतो, तो खोटे सौंदर्य दाखवत नाही . त्याप्रमाणे पत्रकार समाजातील जखमा , अन्याय , विसंगती तो स्पष्टपणे दाखवतो . कारण सत्याकडे पाठ फिरवून समाज पुढे जाऊ शकत नाही . सत्याचा एक प्रामाणिक शब्द प्रकाश निर्माण करतो आणि तो शब्द लिहीणारा पत्रकार आजही समाजाचा दीपस्तंभ आहे .
यावेळी वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दीपेश परब, जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार प्रदीप सावंत, सचिव विनायक वारंग, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य महेंद्र मातोंडकर, पत्रकार दाजी नाईक, योगेश तांडेल, सीमा मराठे, भरत सातोसकर, प्रथमेश गुरव, अजय गडेकर उपस्थित होते .
