You are currently viewing डॉ.शैलजा करोडे यांच्या ग्रंथाला “उत्कृष्ठ ग्रंथ” पुरस्कार
Oplus_16908288

डॉ.शैलजा करोडे यांच्या ग्रंथाला “उत्कृष्ठ ग्रंथ” पुरस्कार

मुंबई :

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून जामनेर तालुका साहित्य —संस्कृती मंडळ आयोजित ग्रामीण युवा साहित्य संमेलन, या दोन दिवशीय संमेलनात जळगावच्या सुपरिचित लेखिका, कवयित्री डॉ.शैलजा करोडे लिखित “निशिगंध ” या ललित लेख संग्रहाला “उत्कृष्ठ ग्रंथ” पुरस्काराने गौरविण्यात आले.

संमेलनाध्यक्ष डाॅ.फुला बागुल सर यांच्या हस्ते तसेच उद्घाटक डाॅ. म.सु. पगारे सर, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डाॅ.आशुतोष पाटील, मा.श्रीधर नांदेडकर सर , आयोजक डी. डी. पाटील सर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

डॉ.शैलजा करोडे यांनी विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केलेले असून त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी देखील आजवर सन्मानित केले गेले आहे. डॉ. करोडे यांचे हे २५ वे पुस्तक आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारासाठी समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा