केणीवाडा राष्ट्रोळी मंदिरावर पिंपळाचे झाड कोसळले..

केणीवाडा राष्ट्रोळी मंदिरावर पिंपळाचे झाड कोसळले..

बांदा प्रतिनिधी
पाडलोस केणीवाडा येथील श्री देव राष्ट्रोळी मंदिरावर जुने महाकाय पिंपळाचे झाड रविवारी पहाटेच्या सुमारास कोसळून नवीन छप्पराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक भूषण केणी यांनी दिली. विशेष म्हणजे गेल्या मे महिन्यात संपूर्ण मंदिराचे नवीन छप्पर पत्र्याचे करण्यात आले होते.

केणीवाडा वाडीतून प्रत्येक कुटुंबाकडून वर्गणी तसेच दात्यांच्या सहकार्यातून मंदिराचे काम पूर्णपणे नवीन करण्य़ात आले होते. गुरूवारी पहाटेच्यासुमारास अचानक मोठा आवाज आल्याने सकाळी ग्रामस्थांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी जुनाट पिंपळाचे झाड मंदिरावर पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. मे २०२० रोजी ग्रामस्थांच्या सहकार्यातून मंदिराच्या छप्पराचे नवीन काम करण्यात आले होते. त्यामुळे केलेला खर्च काहीप्रमाणात वाया गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा