You are currently viewing टप्प्याटप्प्याने रेल्वेसेवा रूळावर येईल….

टप्प्याटप्प्याने रेल्वेसेवा रूळावर येईल….

कोविड लॉकडाऊननंतर अनलॉक सुरू झालेले असले तरी रेल्वेच्या सर्व मेल-एक्स्प्रेस नजीकच्या काळात केव्हा सुरू होतील याविषयी उलटसुलट बातम्या प्रसारमाध्यमातून येत असून त्यासंबंधी रेल्वे बोर्डानेच स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेने सर्व पॅसेंजर ट्रेन आणि मेल-एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात कोणतीही तारीख निश्चित झाली नसून टप्प्याटप्प्याने या सेवा रुळांवर येतील असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे. काही प्रसारमाध्यमात एप्रिलपासून सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या पूर्ववत होतील अशा बातम्या प्रसारित झाल्या आहेत. यासंबंधी रेल्वे बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. सध्या रेल्वेच्या 65 टक्के ट्रेन सुरू आहेत. एकट्या जानेवारी महिन्यात 250 हून अधिक ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.

परिस्थिती आणि मागणी पाहून त्यात आणखी वाढ केली जाणार आहे. प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा