You are currently viewing राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाच्या तालुकाध्यक्षपदी प्रसाद दळवी…

राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाच्या तालुकाध्यक्षपदी प्रसाद दळवी…

राजू धारपवार यूवक तालुकाध्यक्षपदी; अभिषेक पवारांकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी…

सावंतवाडी

राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाच्या तालुकाध्यक्षपदी सावंतवाडी येथील युवा कार्यकर्ते तथा बांधकाम उद्योजक प्रसाद दळवी यांची निवड करण्यात आली आहे. तर राजू धारपवार यांची सावंतवाडी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्षपदी व अभिषेक पवार यांची युवक शहरअध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाअध्यक्ष श्री.अमित सामंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन त्यांनी आज सावंतवाडी येथे राष्ट्रवादी तालुका पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ते श्री. अर्षद बेग यांच्या माध्यमातून आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पक्षाने त्यांच्यावर सावंतवाडी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पद देऊन योग्य तो सन्मान राखला. ही निवड आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणूका नजरेसमोर ठेऊन महत्त्व मानली जात आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाअध्यक्ष अमित सामंत, युवक जिल्हाअध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, ओबीसी सेल जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी उपस्थित आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा