ठाणे :
‘जनसेवा’ हाच धर्म मानणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या नावाने सुरू असलेल्या ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’च्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने. गेले ४ वर्ष आदरणीय मंगेश चिवटे सर व मा. श्री. रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे उप शहर प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे श्री. निखिल जगताप यांनी केलेल्या रुग्णसेवा मदत कार्याचा सन्मान म्हणून कक्षा तर्फे गौरविण्यात आले.
ठाण्याच्या माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा महिला संघटक मा. सौ. मीनाक्षी शिंदे ताई तसेच मा.श्री. मंगेश चिवटे सर यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला.
त्याबदल निखिल जगताप यांनी समस्त वैद्यकीय मदत कक्ष टीमचे आभार मानले आहेत.
सदर कार्यक्रमात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे ठाणे लोकसभेचे खासदार मा. श्री. नरेश म्हस्के व तसेच विविध राजकीय, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. व तसेच सबंध राज्यभरातून वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
