You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात PRI–CBO Convergence प्रकल्पांतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन कार्यशाळा उत्साहात पार

सावंतवाडी तालुक्यात PRI–CBO Convergence प्रकल्पांतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन कार्यशाळा उत्साहात पार

सावंतवाडी तालुक्यात PRI–CBO Convergence प्रकल्पांतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन कार्यशाळा उत्साहात पार

सावंतवाडी

PRI CBO Convergence (Universalisation) प्रकल्पांतर्गत सावंतवाडी तालुक्यात तालुकास्तरीय मूल्यमापन कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना, दीपप्रज्वलन व स्वागतगीताने करण्यात आली. स्वागत व प्रस्तावना BMIBCB स्वाती मॅडम यांनी केली.

तळवडे येथील LRP श्रीम. मयुरी दळवी यांनी PPT द्वारे प्रातिनिधिक सादरीकरण केले. बालसभा सदस्य कौस्तुभ गावडे आणि प्रथमेश परब यांनी आपल्या अनुभवांची मांडणी केली. अक्षरज्योती लाभार्थी श्रीम. भारती माणगावकर तसेच विविध LRP यांनीही प्रकल्पाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

सातुळी–बावळाट येथील सरपंचा मा. सोनाली परब, तळवडे ग्रामपंचायत सदस्य मा. केशव परब व भालावल ग्रामपंचायत अधिकारी मा. तृप्ती राणे यांनी गावपातळीवरील उपक्रमांबाबत अनुभव सांगितले. त्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून झालेल्या सकारात्मक बदलांचा उल्लेख केला आणि आगामी काळातही ग्रामपंचायत व समुदाय संस्थांचा संयुक्त सहभाग राहील असे सांगितले.

गॅलरी वॉक या उपक्रमाद्वारे नऊ प्रभागसंघांनी गेल्या दोन वर्षांतील कार्याचा चार्ट स्वरूपात आकर्षक सादरीकरण केला. यानंतर प्रकल्पातील सर्व अॅक्टिव्हिटीचे मूल्यमापन करण्यात आले.

कुडुंबश्री NRO चे COO मा. प्रशांत पी यांनी गॅलरी वॉकमध्ये सहभाग घेत मार्गदर्शन केले. त्यांनी पुढील कार्यदिशा आणि उद्दिष्टांवर सविस्तर चर्चा केली. जिल्हा अभियान व्यवस्थापक मा. वैभव पवार यांनी जिल्हास्तरीय योजनांची माहिती दिली, तर राज्य व्यवस्थापक मा. प्रसाद कांबळे यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास कुडुंबश्री NRO केरळच्या प्रिया पॉल (प्रोजेक्ट मॅनेजर), सम्यक लोहकरे (प्रोजेक्ट लीड), श्वेता पांढरे (स्टेट प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर), तसेच जिल्हा व्यवस्थापक निलेश वालावलकर, नितीन जावळे, विविध तालुका व्यवस्थापक, CLF सदस्य, प्रभाग समन्वयक, CLF मॅनेजर, LRP, CRP आणि सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रकल्पातील समन्वयाचे प्रतीक म्हणून केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा