You are currently viewing कणकवली बाजारपेठेत मेडिकलमध्ये बैल घुसल्‍याने कर्मचाऱ्यांची तारांबळ…

कणकवली बाजारपेठेत मेडिकलमध्ये बैल घुसल्‍याने कर्मचाऱ्यांची तारांबळ…

कणकवली

कणकवली शहरातील बाजारपेठेतील एका मेडिकल दुकानामध्ये मोकाट बैल घुसला. त्‍यामुळे दुकानातील महिला कामगारांची एकच तारांबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने या बैलाला दुकाना बाहेर हुसकावून लावले. मात्र या प्रकाराची चर्चा शहरात होती. तसेच मोकाट गुरांच्या उपद्रवाबाबतही नाराजी व्यक्‍त झाली.
मंगळवार हा कणकवली शहराचा आठवडा बाजाराचा दिवस. मंगळवारच्या बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असल्‍याने मोकाट गुरांचाही वावर बाजापरेठेत असतो. भाजी आणि फळ विक्रेत्‍यांना नेहमीच त्रास देणाऱ्या या मोकाट जनावरांमधील एका बैलाने आज चक्‍क मेडिकल दुकानात धाव घेतली. त्‍यामुळे आतील महिला कामगारांना बाहेर पळावे लागले. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी मेडिकल दुकानाचे काऊंटर बाजूला करून बैलाला तेथून हुसकावले.

प्रतिक्रिया व्यक्त करा