You are currently viewing पिंपळपान……

पिंपळपान……

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पिंपळपान……*

 

आठवणींच्या पिंपळपानी,

नक्षी जाळीची आरस्पानी!

इवल्या इवल्या छिद्रातुनी त्या,

भरली होती असंख्य स्मृतींनी !..१

 

अनंत घरटी आठवणींची,

बाळगतो पिंपळ खांद्यावरती!

सोशिक,संयम देऊन मनाला,

आधार देतसे जगण्यासाठी!.२

 

काळाचे अंतर मिटून जाते,

पाहता पाहता पिंपळपान!

त्या वृक्षाच्या छायेखाली,

बसते तेव्हा लागते ध्यान! .३

 

पिंपळ रोप वाढते, बहरते,

पारंब्यांनी अस्तित्व टिकवते!

त्या पारावर बसले की ,

मनात माझ्या स्मृती जागवते!.४

 

दीर्घायुष्य त्याचे असे ऋषीपरी,

पारंब्या त्याच्या जटाच असती!

त्याला पाहून आयुष्याची,

कळते मनाला ती गूढ महती!..५

 

उज्वला सहस्रबुध्दे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा