You are currently viewing !! अमृतगाथा !!

!! अमृतगाथा !!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे यांची अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

 

*!! अमृतगाथा !!*

 

मंगल भूमी पवित्र भूमी अभिमाने वंदू

शौर्य स्फूर्तिची अमृतगाथा उच्चरवे गाऊ ||

 

थोर वारसा असे लाभला क्रांतिकारकांचा

अभिमानाने ऊर भरतसे आठव वीरांचा

त्यांच्या शौर्या सलाम करुनी उतराई होऊ

शौर्य स्फूर्तिची अमृतगाथा उच्चरवे गाऊ ||

 

स्मरण ठेवुनी बलिदानाचे देशहितास जपू

भारतभूची कीर्ति पताका उंच उंच नेऊ

पांग फेडणे मातृभुमीचे खूणगाठ बांधू

शौर्य स्फूर्तिची अमृतगाथा उच्चरवे गाऊ ||

 

ध्येय घेऊनि प्रगतीसाठी धाव घेत राहू

जगा जिंकता मानवतेचे भान नित्य ठेवू

यश कीर्तीचे निशाण अविरत फडकत ते ठेवू

शौर्य स्फूर्तिची अमृतगाथा उच्चरवे गाऊ ||

 

कला संस्कृती परंपरांची मनी जाण ठेवू

मातृभुमीच्या उध्दरणाचे वाण ओटी घेऊ

पवित्र उज्वल नावलौकिका अखंडीत राखू

शौर्य स्फूर्तिची अमृतगाता उच्चरवे गाऊ||

 

मंगल भूमी पवित्र भूमी अभिमाने वंदू

शौर्य स्फूर्तिची अमृतगाथा उच्चरवे गाऊ ||

 

ज्योत्स्ना तानवडे.

वारजे, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 17 =