You are currently viewing थांब हतबला

थांब हतबला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा, आजगावचे सन्माननीय सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*थांब हतबला*
*सोड हा दुबळेपणा*

कलेची माती माती झाली
कला मातीतच रुजली |
कलेचा कचराच झाला
कला कचऱ्यात रुजली ||१||
कला आकाशात पेरली
तेथेही ती अवतरली |
जल अश्म नादी लागली
पंचतत्वी अवतरली ||२||
सर्वव्यापक कला झाली
कुठे अणुरेणु परते |
विविधतेत एक झाली
तुम्ही आम्ही नाही परते ||३||
तू स्वतः आहे नेककला
सर्व कलांनीच भरला |
जागव स्मृती सुज्ञबला
का पराजयाने हरला ||४||
मोडेन, वाकणार नाही
भाषाच आहे अहंकारी |
वाकेन नम्र होऊन ही
सोडून भाषा अहंकारी ||५||
जग सुंदर तुझ्यासाठी
सर्वांसाठी निसर्गासाठी |
हे तुझे सर्वोत्तमासाठी
जगणे व्हावे सर्वांसाठी ||६||

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला,
जि. :- सिंधुदुर्ग, राज्य. :- महाराष्ट्र.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =