You are currently viewing 28 नोव्हेंबर रोजी लोटांगण साठी प्रसिध्द असणाऱ्या सोनुर्ली श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

28 नोव्हेंबर रोजी लोटांगण साठी प्रसिध्द असणाऱ्या सोनुर्ली श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर आणि लोटांगण साठी प्रसिध्द असणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव येत्या दि. 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा व कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तसेच लोटांगण नवसही फेडतात.

श्री देवी माऊली जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. जिल्ह्यातील मोठ्या जत्रांना सोनुर्लीच्या जत्रेपासून प्रारंभ होतो.

या जत्रोत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तसेच इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक नवस बोलणे व नवस फेडण्यासाठी येत असतात. या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनूर्ली माऊली देवस्थानं कमिटी पदाधिकरी यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =