*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सहामाही परीक्षा* (बालगीत)
—————————————-
दिवाळीच्या सुट्टीमध्ये
खूप मज्जा करू
बेत त्याचे सारे
आताच होतील सुरु
अंगणामध्ये किल्ला बांधू
भुईनळ्याचे बार उडवू
सुंदर सुंदर कांदिलाचे
दारा पुढे तोरण चढवू
नवे नवे कपडे छान
रांगोळ्यांनी अंगण सजवू
चिवडा, चकली, लाडू खात
घर आनंदाने भिजवू
धोतर, चादर पडदे लावून
एखादसं नाटक बसवू
कुठलं, कसलं सोंग काढून
आजी, आजोबांना फसवू
सहल काढू गावा बाहेर
तळ्या काठी फिरून येऊ
वाचनालयात जाऊन रोज
नवे पुस्तकं बदलून घेऊ
बेत तर खूप ठरलेत
मज्जा येईल खूप खास
त्या पूर्वी सोसावा लागेल
सहामाही चा थोडा त्रास
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे

