You are currently viewing कणकवलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांची कुडाळ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती

कणकवलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांची कुडाळ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती

तर कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची तडकाफडकी बदली..

 

कुडाळ :

कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांना कुडाळ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची तडकाफडकी कणकवली पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. कणकवली पोलीस निरीक्षक पदी असलेल्या राजेंद्र हुलावले हे यापूर्वी कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पदोन्नतीने त्यांना कणकवलीत पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली होती.

काही दिवस श्री. हुलावले याांनी कणकवली पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार यशस्वीरित्या संभाळला होता. मात्र कुडाळ पोलीस निरीक्षक पदावरून श्री मेंगडे यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर त्यांच्या जागी हुलावले यांना नियुक्ती देण्यात आली. श्री मेंगडे हे कुडाळ मध्ये हजर झाल्यावर सुमारे तीन ते चार महिने झाले होते. एवढ्या कमी कालावधीत त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने या बदली मागे नेमकी कारणे काय? असा सावाल उपस्थित केला जात आहे. पावसाळी अधिवेशना दरम्यान ही बदली झाल्याने बदली बाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 10 =