कुडाळ :
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत सोमवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे काढण्यात येणार आहे.
कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण ठरविण्याची ही सोडत प्रक्रिया सार्वजनिक उपस्थितीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे.
सदर सोडतीसाठी संबंधित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार तसेच नागरिकांनी ठरलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले आहे.
