You are currently viewing तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

सावंतवाडी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. ही स्पर्धा खेमराज मेमोरियल स्कूल, बांदा येथे नुकतीच पार पडली.

या स्पर्धेत विविध गटांमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे:

१७ वर्षांखालील गट:

कु. मेल्सी डिसोजा हिने १०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरावर स्थान निश्चित केले आहे.

कु. संगम धारगळकर या विद्यार्थ्याने ११० मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात द्वितीय स्थान मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

या गटात कु. प्रियाली नागडे हिने २०० मीटर धावणे प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला.

१४ वर्षांखालील मुलांचा गट:

या गटातील तीन खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे:

कु. करण कासरलकर याने थाळीफेक आणि भालाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.

कु. युवराज तळकटकर याने ८० मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.

कु. शुशोधन सावंत याने ६०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

इतर यशस्वी विद्यार्थी:

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात एका खेळाडूने ४०० मीटर धावणे प्रकारात तृतीय स्थान मिळवले.

याच गटातील फ्रान्सिस तिरकी याने २०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात तृतीय स्थान पटकावले.

तसेच, १०० मीटर रिले या क्रीडा प्रकारात १४ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही समूहांनी तृतीय स्थान मिळवले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. हितेश मालंडकर आणि श्रीमती. शेरॉन अल्फांसो यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका श्रीमती. संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा