You are currently viewing दुचाकी – पिकअप अपघातात दुचाकीस्वार ठार

दुचाकी – पिकअप अपघातात दुचाकीस्वार ठार

हडी कांदळगाव राणेवाडी येथील घटना

मालवण

तांबळडेगहून मालवणच्या दिशेने येणाऱ्या एका मोटरसायकलस्वाराची समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार राजेश नारायण बांदेकर वय (३०) राहणार तारकर्ली मधलीवाडी हा जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हडी कांदळगाव राणेवाडी येथील उतारावरील धोकादायक वळणावर घडला. मिळालेल्या माहितीनुसार मालवण-हडी मार्गावरील कांदळगाव राणेवाडी येथील उताराच्या रस्त्यावर मोटारसायकल व बोलेरो पीक अप गाडी यांच्यात आज सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. यातील मोटरसायकल स्वार राजेश बांदेकर हा आपल्या ताब्यातील मोटरसायकल एम.एच.०७.आर.५६०७ घेऊन मालवणच्या दिशेने येत होता. बांदेकर याची मोटरसायकल हडी-कांदळगाव राणेवाडी येथील उतारावर येत असताना त्याची मोटारसायकल समोरून येणाऱ्या मालवणी बझारच्या बलेरो पिकअप गाडीला (एम.एच.०७.एजे.१३७१) धडक बसली, ही धडक एवढी जोरदार होती की मोटारसायकलस्वार राजेश बांदेकर हा जागीच ठार झाला. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =