You are currently viewing सुचेतस आर्ट्सचे कथा, कादंबरी आणि विशेष पुरस्कार जाहीर आणि वितरीत 

सुचेतस आर्ट्सचे कथा, कादंबरी आणि विशेष पुरस्कार जाहीर आणि वितरीत 

बिजलीनगर चिंचवड –

महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथासंग्रह / कादंबरी ह्या साहित्यकृतीचा गौरव करावा आणि नवीन मराठी साहीत्यिकांना प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने  ‘सुचेतस आर्ट्स’ “कै. सर्जेराव माने स्मृती कादंबरी पुरस्कार” व ‘कै. इंदुमती कोकाटे पाटील (बाबी) स्मृती कथासंग्रह / विशेष पुरस्कार’ सुरू केले आहे. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा‌ दिनांक २८ सप्टेंबर रोजी पुण्यात नऱ्हे येथे श्री किशोर वैद्य यांच्या निवासस्थानी पार पडला. वयोमानानुसार ते चिंचवड येथे येऊ शकणार नव्हते म्हणून आयोजकांनी तिथे जाऊन पुरस्कार दिला.

या प्रसंगी ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा, कथा लेखिका सौ.माधुरी वैद्य डिसोजा, परिक्षक सौ अश्विनी कुलकर्णी, प्रज्ञा मराठे उपस्थित होते.

दुसऱ्या वर्षी देखील लेखकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असे आयोजक विनिता माने – पिसाळ यांनी सांगितले.

नाशिकचे सर्वश्रुत लेखक श्री. श्रीराम शिंगणे व पुण्याच्या बहुश्रुत वाचक सौ. अश्विनी कुलकर्णी यांनी परीक्षण केले. कादंबरी प्रकारात, लेखक श्री अविनाश महाडिक, मुंबई यांचे  ‘वायंगी’ हे पुस्तक सर्व निकषांवर पुरेपूर उतरले.  स्पेशल आणि वेगळ्या कॅटेगरीत लेखक कै श्री गोपाळ शंकर वैद्य, पुणे लिखित व किशोर वैद्य संकलित ‘रत्नगीतार्या’ ह्या पुस्तकाने पुरस्कार पटकावला. शाल, मानपत्र व रोख रक्कम ११०० रुपये असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कारांच्याअधिक माहितीसाठी सुचेतस आर्ट्स च्या वेबसाईटवर् अथवा व्हॉटसअपवर माहिती घ्यावी संपर्क – 7709073008 (www,suchetasindia.in)असे संयोजक विनीता माने पिसाळ यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा