You are currently viewing वीज खांबावरुन कोसळल्याने सावंतवाडीत वायरमन जखमी…

वीज खांबावरुन कोसळल्याने सावंतवाडीत वायरमन जखमी…

सावंतवाडी

वीजेच्या खांबावर काम करीत असताना खाली कोसळल्यामुळे वायरमन जखमी झाले. हा अपघात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील साधले मेस परिसरात घडला. जखमी सावंत यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे.असे वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता शंकरराव भोरे यांनी सांगितले.
श्री.सावंत हे आपल्या सहकार्‍यांसमवेत त्या ठिकाणी काम करण्यासाठी गेले होते. वीज खांबावर चढले असताना, अचानक तोल गेल्याने ते खाली कोसळले, असे सांगण्यात आले.प्रसाद काशिनाथ सावंत,असे जखमीचे नाव आहे. त्या ठिकाणी जमलेल्या नागरीक व सहकारी कर्मचार्‍यांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेले.

प्रतिक्रिया व्यक्त करा