You are currently viewing सुकळवाड श्री ब्राम्हणदेव वार्षिक जत्रोत्सव २१ डिसेंबर रोजी

सुकळवाड श्री ब्राम्हणदेव वार्षिक जत्रोत्सव २१ डिसेंबर रोजी

ब्राम्हणदेव क्रीडा मंडळाच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी :

श्री ब्राम्हणदेव सुकळवाडच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवा निमित्त १२ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध गटातील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील खुल्या गटातील स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २१००१ रुपये, एक ग्रामपंचायत स्पर्धेसाठी ८००१ रुपये, सुकळवाड करंडक स्पर्धेसाठी ५००१ तर १४ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५०१ रुपये, बक्षीस ठेवण्यात आले आहे.

श्री ब्राम्हणदेव क्रीडा मंडळ सुकळवाडच्या वतीने १२ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२१ या कालावधीत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कै.पंच दिलीप सावंत चषक एक ग्रामपंचायत क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ८००१, द्वितीय ६००१ व चषक ठेवण्यात आले आहे. १६ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या सुकळवाड करंडक (गाव मर्यादित) क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१, द्वितीय ३००१ व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

१८ डिसेंबर रोजी होणाऱ्या १४ वर्षाखालील मुलांच्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५०१ रूपये, द्वितीय १००१ ठेवण्यात आले आहे. तर १९ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत खुल्या गटातील श्री ब्राम्हणदेव चषक क्रिकेट स्पर्धा होणार असून या साठी प्रथम पारितोषिक २१००१ व द्वितीय ११००१ रूपये ठेवण्यात आले असून सर्व गटातील स्पर्धांमधील उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, मालिकविर यांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.तरी जिल्ह्यातील क्रिकेट संघानी उत्स्फूर्त पणे सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी. तसेच २१ डिसेंम्बर रोजी होणाऱ्या श्री ब्राम्हणदेव सुकळवाडच्या वार्षिक जत्रोत्सवचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री ब्राम्हणदेव क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eleven =