You are currently viewing विजयदुर्ग किल्ल्यावर भव्य स्वच्छता मोहिम राबवली..

विजयदुर्ग किल्ल्यावर भव्य स्वच्छता मोहिम राबवली..

विजयदुर्ग किल्ल्यावर भव्य स्वच्छता मोहिम राबवली..

मा. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या सेवा पंधरवड्यांतर्गत उपक्रम

देवगड –
भारतीय जनता पक्षाच्या सेवा पंधरवड्यानिमित्त आणि भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज विजयदुर्ग किल्ला परिसरात भव्य स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या अभियानाचे आयोजन भाजप पडेल मंडलाच्या वतीने करण्यात आले होते.

स्वच्छता मोहिमेची सुरुवात किल्ल्यावरील भवानी देवीच्या गार्‍हाण्याने झाली. त्यानंतर २०/२० जणांच्या कार्यकर्त्यांच्या टीम तयार करून संपूर्ण किल्ला परिसरात स्वच्छता करण्यात आली. मोहिमेसाठी एकूण ४० गवत कापण्याच्या मशीन आणि सुमारे २०० कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यामध्ये शालेय विद्यार्थी, महिला तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय होता.

या अभियानात भाजपा नेते बाळा खडपे, पडेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, जिल्हा पदाधिकारी रवी पाळेकर, डॉ. अमोल तेली, अरिफ बगदादी, संजय बोंबडी, भूषण पोकळे, रामकृष्ण जुवाटकर, भूषण बोडस, अंकुश ठुकरूळ, संजना आळवे, विजयदुर्ग सरपंच रियाज काजी, पडेल सरचिटणीस रवींद्र तिर्लोटकर, रामकृष्ण राणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

“विजयदुर्ग किल्ला हा जागतिक वारसा असून, तो स्वच्छ ठेवणे ही फक्त माझी जबाबदारी नाही तर माझे कर्तव्य आहे,” असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. उपस्थित सर्वांनी किल्ल्याच्या जतनासाठी आणि स्वच्छतेसाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प केला.

या उपक्रमामुळे विजयदुर्ग किल्ला पुन्हा एकदा तेजस्वी आणि स्वच्छ रूपात पर्यटकांचे आकर्षण ठरतो आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा