देवगड तालुक्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न….

देवगड तालुक्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न….

खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार देवगड तालुका पदाधिकारी यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी केले.

एखाद्या योजनेचे महत्त्व पटवून देण्याचं कौशल्य प्रभूगावकर यांच्या कडे असून त्यांनी देवगड ला समुद्र किनारी भागातील भौगोलिक परिस्थिती समोर ठेवली व या योजनेचा लाभ कसा होऊ शकतो याचे मार्गदर्शन केले.

तर मछीमार नेते तथा मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी देवगड मधील कुठल्या भागात कशा पद्धतीने ही योजना राबवून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केले जाऊ शकतात याचे मार्गदर्शन केले आहे.जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी या योजनेस अनुसरून इतर वैयक्तिक लाभाच्या सुद्धा योजनेचे मार्गदर्शन करून सदर योजनेस बॅंकेचे माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याची ग्वाही सुद्धा यावेळी दिली आहे.जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी ही योजना आपल्या कार्यकर्त्यांसह तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी आमच्यावर जबाबदारी दिली आहे आणि खासदार साहेबांच स्वप्न आहे की माझे कार्यकर्ते, महिला भगिनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजेत.

तुम्ही पदाधिकारी जेवढे तळागाळापर्यंत मधील लोकांमध्ये अशा प्रकारच्या योजनांचा माध्यमातून जोडले जाणार तेवढ्या प्रमाणात त्या भागातील जनता तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे आणि त्याचा फायदा भविष्यात आपल्याला संघटनेचे माध्यमातून निवडणूका जिंकण्यासाठी सोपं जाणार आहे.तरी या योजनेचा लाभ सर्वांनी घेऊन सर्व शाखाप्रमुख यांच्या माध्यमातून गावातील जनतेला सुद्धा याचा लाभ मिळवून देण्यासाठी आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, प्रमुख मार्गदर्शक मा.जि.प.अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,मछीमार नेते तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम, महिला उपजिल्हा संघटक सौ पूर्वा सावंत, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, सदस्या सौ वर्षा पवार, माजी उपसभापती देवरुखकर, प्रसाद करंदीकर व पदाधिकारी, महिला उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा